सिंधू डोमळे यांच्या जमिनीवरील 2 सागवान वृक्षाची शेजाऱ्यांनी केली सरेआम कत्तल , तक्रारी नंतर वनविभागाची कारवाई (Video viral )

देवरी /पुराडा 16: नुकताच पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्व आणि जनजागृती मोठ्या उत्साहात करण्यात आली. परंतु देवरी तालुक्यातील पुराडा गावात एक वेगळाच प्रकार घडला असून एका शेजारील व्यक्तीने एका वृद्ध महिलेच्या खाजगी जमिनीवरील 2 सागवान वृक्षाची सरेआम कत्तल केली असल्याची घटना घडली आहे. कुठलेही मालकीचे झाड कापण्यासाठी वन विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असते.

सविस्तर वृत्त असे कि तालूक्यातील पुराडा येथील सिंधू डोमळे (60) यांची गट क्र 506 येथे 8 आर अशी मालकीची जमीन आहे. सदर जमिनीवर 3 सागवान जातीच्या झाडाची 7/12 वर नोंद देखील आहे. परंतु त्या जमिनीच्या शेजारी राहणारे तेजभान श्रीधर मरकाम याने दि 14 जून च्या सायंकाळी 6:30 च्या दरम्यान आपल्या साथीदारांसह चक्क 2 सागवान जातीच्या वृक्षाची कत्तल केली असून त्याचा विडिओ समोर आला आहे. सदर प्रकरणाची माहिती सिंधू डोमळे यांच्या मुलाला माहिती होताच त्यांनी गावातील पोलीस पाटील आणि तंटामुक्त समिती सह वनरक्षक व वन विभागाला घटनेची माहिती दिली.

सदर प्रकरणाची देवरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (उत्तर ) यांना दि.15 जून ला झालेल्या प्रकारची लिखित तक्रार करण्यात आली . त्या तक्रारी नुसार दि.16 जून ला कारवाई करण्यात आली असून कापलेल्या सागवान वृक्षांना ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी पुराडा वनक्षेत्राचे वनरक्षक पारधी यांच्या सह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Share