राष्ट्रसेविका समितीचे प्रारंभिक शिबिर उत्साहात
गोंदिया : जिल्हा राष्ट्रसेविका समितीचे सात दिवसीय प्रारंभिक शिबीर 4 ते 11 तूनदरम्यान स्थानिक रामनगर येथील सरस्वती शिशू मंदिरात पार पडले.शिबिरात जिल्ह्यातील आमगाव, अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोरेगाव, गोंदिया येथील एकूण 64 भगिनी व मातृशक्ती सहभागी झाल्या होत्या. शिबिराधिकारी म्हणून सुभषा यदूवंशी यांनी निरीक्षण केले. सात दिवस सकाळी 5 ते रात्री 10 वाजतादरम्यान दररोज शारीरिक, बौद्धिक, व्यायाम, खेळ, चर्चा-सत्र, कार्यशाळा आदीचे आयोजन करण्यात आले. शिबिरात आर्या उरेकर, डॉ. प्रतिभा राजहंस, उमेश मेंढे, डॉ. सत्यप्रकाश मेहरा सुषमा यदूवंशी यांनी मार्गदर्शन केले. 10 जून रोजी सायंकाळी शहरात भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. 11 जून रोजी शिबिराचा समारोप झाला. समारोप समारंभाला रोहिणी आठवले, भंडारा विभाग सहकार्यवाहिका चित्रा वांगलवार प्रामुख्याने उपस्थित होत्या. समारोपीय कार्यक्रमात रोहिणी आठवले यांनी शिबिराची मध्यवर्ती कल्पना व देश माझा देव या विषयावर मनोगत व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, राष्ट्रसेविका समितीची मातृशक्ती व नगर परिषद कर्मचार्यांनी सहकार्य केले.