दहा वर्षीय मुलीने वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

प्रहार टाईम्स
देवरी : मानवाला त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व गोष्टी अगदी निरपेक्ष हेतूने वृक्ष देतात.मानवाची अन्नधान्याची गरज भागविण्यापासून,घर सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू ही वृक्षाची देन असून आयुर्वेदातील औषधांचा पुरवठा ,सौंदर्य प्रसाधनांची उपलब्धता वृक्षामुळे होते .
वृक्षाला खूप मोठे महत्त्व आहे.संत तुकाराम महाराज यांनी तर आपल्या अभंगामध्ये वृक्षांचे महत्त्व सांगताना “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” असे म्हटले समाजात अशी आपली जवळची माणसे आनंद व सुख देतात तसेच वृक्ष सुद्धा सुख देतात.
देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत भर्रेगांव येथील योगराज साखरे (ग्राम पंचायत सदस्य भर्रेगांव ) यांची मुलगी आरोही योगराज साखरे रा. नवाटोला वय १० वर्ष इयत्ता चौथा वर्ग, छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा देवरी येथे शिक्षण घेत असून हिने बाजारातून मातीचे भांडे आणून लागणारे खाऊचे पैसे त्या मातीच्या भांड्यामध्ये गोळा केले. तिला पर्यावरणाचे चित्राची खूप आवड असल्यामुळे तिच्या वाढदिवसानिमित्त विहारात गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून १० वृक्ष लावले. देवरी पंचायत समितीचे सदस्य प्रल्हाद सलामे, भर्रेगांव ग्रामपंचायत सरपंच लखनलाल पंधरे, ग्राम पंचायत सचिव सी.आर.चाचेरे,उपसरपंच जयेंद्र मेंढे, ग्रामपंचायत सदस्य नंदलाल नेताम ,ग्रामपंचायत सदस्य योगराज साखरे, रामेश्वर कुमोटे,संतोष खोटेले, दिलीप बडोले ,डालचन्‍द मडावी, रेवचंद खोटेले, वैभव कोचे सरिता रहिले (अंगणवाडी सेविका) सारिका साखरे (आशा सेविका) हेमंत कुमोटे,राजकुमार दर्रो,रंजीत नंदेश्वर इत्यादी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share