प्रसिद्ध पंजाबी गायक सिंधु मुसेवाला याला खालसा सेवा दल देवरी तर्फे श्रद्धांजली अर्पण

प्रहार टाईम्स

देवरी 08: खालसा सेवा दल देवरी तर्फे प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसवाला याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा येथे पंजाबी गायक सिद्धू मुसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वयाच्या २८ व्या वर्षी त्यांचे हे जग सोडून जाणे हा कुटुंबासह चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.

सिद्धू मूसेवाला याच्या निधनानंतर लोक त्याला वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहत आहेत. अशीच एक श्रद्धांजली देवरी तालुक्यातील शीख समुदायामार्फत देण्यात आली असून खालसा सेवा दल यांच्या मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन देवरीच्या गुरुनानक चौकात करण्यात आले होते.

सदर श्रद्धांजलीच्या वेळी शुभदिप सिंह उर्फ सिंधु मुसेवाला यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. खालसा सेवा दल, पंजाबी कुटुंबीय , सरबजितसिंग भाटिया , जसविंदरसिंग भाटिया , मित्र मंडळी आदी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share