डवकी आदिवासी संस्थेच्या आधारभूत धान खरेदी केंद्राचे उदघाटन

■ देवरी येथील एम.आय.डी.सी. मधील अनिल बिसेन यांच्या गोडाऊन मध्ये धान खरेदीला शुभारंभ.

देवरी, ता.०८: आदिवासी विकास महामंडळ देवरी अंतर्गत येणाऱ्या डवकी येथील आदिवासी सहकारी संस्थेच्या देवरी येथील एम.आय.डी.सी. मधील अनिल बिसेन यांच्या गोडाऊन मध्ये मंगळवारी(ता.७ जून) रोजी रब्बी हंगामातील शासकीय आधारभूत धान खरेदीचे उदघाटन करण्यात आले.
या धान खरेदीचे उदघाटन माजी आमदार संजय पुराम यांच्या हस्ते आणि आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुराम, उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुडेवार, डवकी संस्थेचे अध्यक्ष मेहत्तरलाल कोराम, उपाध्यक्ष भास्करभाऊ धरम शहारे, चिचेवाडा संस्थेचे संचालक प्रेमलाल पिसदे, डवकी संस्थेचे संचालक ऋषीकपूर कोरे, मन्साराम उईके, जगदीश बावनकर, कोंदुजी लटये, लक्ष्मण नाईक, संतोष खोटेले, गिरधारी राऊत, रामचंद्र परसगाये, तुकाराम नाईक, प्रमिलाबाई कोल्हारे, भोजराज ठाकरे, ताराबाई सलामे, संतुलाल दर्रो व संस्थेचे सचीव सुनील औरासे यांच्या सह डवकी संस्थे अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकरी व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डवकी संस्थेचे सचीव सुनील औरासे व उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष भास्करभाऊ धरमशहारे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share