आदिवासी आश्रमशाळेतील मुला-मुलींकरिता पहिल्यांदाच प्रकल्प कार्यलयाच्यावतीने समर कॅम्प आयोजित, जिल्हाधीकार्यांचे पारितोषिक वितरण
गोंदिया 08: जिल्यात आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालया अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या १२ आदिवासी आश्रम शाळेतील मुला-मुलींना देखील इतर खाजगी शाळे प्रमाणे समर कॅम्प चे आनंद घेता यावे म्हणून गोंदिया जिल्यात पहिल्यांदाच समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये १२ आदीवासी आश्रमशाळेतील प्रत्येकी पाच मुला -मुलींची निवड करण्यात आली असून काल याचा समारोप करण्यात आला असून या समर कॅम्प मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले तर सहा विद्यर्थ्यांना उत्तर भारत फिरण्या करिता विमान प्रवाशाची संधी मिळाली आहे.
गोंदिया जिल्यातील १२ आदिवासी आश्रम शाळेतील मुला मुलींनी या उन्हाळी शिबिरात सहभाग घेतला असून ५ मे ला याची सुरवात करण्यात आली तर ८ जूनला याचा समारोप करण्यात आला असून एका महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सह,योगा ,संगीत ,तायकान्डो ,पेंटींग ,आत्मनिर्भरता आदी प्रशिक्षण देण्यात आले असून विद्यार्थ्यांना देखील हि संधी उपलब्ध झाल्याने प्रकल्प अधिकारी कार्यलयाचे आभार मानले आहे. तर या समारोपीय कार्यक्रमाला जिल्हाधीकारी नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकरी अनिल पाटील यांनी हजेरी लावत विद्यर्थ्यांना मार्गदर्शन केले असून पुढच्या वर्षी हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेत देखील राबवू असे अनिल पाटील म्हणाले तर अश्या नावीन्य पूर्ण उपक्रमाला कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे नयना गुंडे म्हणाल्या.
गोंदिया जिल्यात आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यलयच्या वतीने राबविण्यात आलेला उपक्रम राज्यातील इतर आदिवासी आश्रम शाळेत राबविला जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास रांचेलावर यांनी दिली तर विद्यार्थ्यांनी देखील या एका महिन्याच्या प्रशिक्षणात शिकायला मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. दुसरी कडे उन्हाळी शिबिराशह विद्यार्थ्यांना नीट NEET आणि JEEE सारख्या स्पर्धा परीक्षांचे धडे या दरम्यान मिळाल्याने भविष्यात आम्ही देखील डॉक्टर इंजिनियर बनू असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.