१५ जूनपासून वाजणार शाळांची घंटा

गोंदिया ■ संसर्ग आटोक्यात आल्यानंतर शाळा पुर्णतः सुरू झाल्या. त्यातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपल्यानंतर येत्या १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अधिनस्त शिक्षण विभागांना सुचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र राज्यात पुन्हा काही ठिकाणी संसर्ग डोके उंचावत आहेत. तेव्हा नियमांच्या अधिन राहून शाळा सुरू करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र पुन्हा गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबई, ठाणे मोठ्या अशा शहरांमध्येही पुन्हा कोरोनाचा प्रसार होत आहे. असे असताना राज्यात पुन्हा एकदा नव्या शैक्षणिक वर्षांतगर्त येत्या १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात शाळा पुन्हा बंद होणार की शाळा सुरुच राहणार यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शाळा बंद करणे चुकीचे असल्याचे गायकवाड म्हणाल्या.

सध्या कोरोना वाढत आहे त्यामुळे आम्हाला निश्चितच काही निर्णय घ्यावे लागतील. सध्या शाळा सुरु करणे गरजेचे आहे. या महिन्याच्या १५ तारखेला शाळा सुरु होतील. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता शाळा सुरु ठेवणे अवश्यक आहे. शाळा, शिक्षक, वही असं वातावरण असणं आवश्यक आहे. मागील दोन वर्षांमध्ये दुसरीची मुले शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. संसर्गच्या काळात शाळा बंद असल्याने याचे विपरित परिणाम शैक्षणिक सत्रावर पडले. आजही त्याचे पडसाद कायम आहेत. अशा स्थितीत ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू करणे, आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने यंत्रणेला सुचित करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share