गडचिरोली पोलीस भरती बाबत उमेदवारांसाठी आवश्यक सूचना जारी

प्रतिनिधी / गडचिरोली : कोरोना महामारी आल्यापासून कोणतीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस भरती सुद्धा लांबणीवर पडली होती. त्यामुळे २०२० रोजी रिक्त असलेली गडचिरोली जिल्ह्यातील १३६ पदे भरण्याकरीता, पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे.
गडचिरोली पोलीस भरती बाबत उमेदवारांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
– ५ जून हि पोलीस भरती आवेदन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख होती, यांनतर आवेदन अर्ज स्विकारले जाणार नाही.
– उमेदवारांनी ज्या ठिकाणी आवेदन अर्ज जमा केले आहेत, त्याच ठिकाणी हॉल तिकीट मिळतील, तसेच ई-मेल द्वारे मिळतील.
– लेखी परीक्षेची तारीख व हॉल तिकीट मिळण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

Print Friendly, PDF & Email
Share