देवरीत मुक्या प्राण्याला कुऱ्हाड मारून जखमी केले , पशुधन विकास अधिकारी व पशुप्रेमी यांच्या प्रयत्नाने उपचार सुरु
देवरी 06: दिवंसेदिवस माणुसकी संपत चाललेली आहे , याचेच जागते उदाहरण देवरी मध्ये समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्याचा तापमान 46 अंशावर गेला असून पाण्याच्या शोधात मुके प्राणी भटकत असतात. तहान भागविण्यासाठी मुक्या प्राण्यांना पाणी देण्या व्यतिरीक्त चक्क कुऱ्हाडीचे घाव देऊन जखमी केल्याची घटना देवरी येथे घडली. सदर घटनेमुळे देवरीच्या लोकांची माणुसकी संपली का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
जखमी बैल जातीचा प्राणी रक्तबंबाळ देवरीच्या रस्त्यावर धावत फिरत असतांना काही पशु प्रेमींनी हेल्पिंग बॉयस ग्रुपच्या सदस्यानी त्याला खूप मेहनतीने पकडले आणि देवरीचे पशु विकास अधिकारी यांना सूचना दिली. रात्री 10 वाजता पासून या प्राण्यावर बँक ऑफ बडोदा समोर उपचार सुरु असून डॉ. खुशहाल पारधी पशुधन विकास अधिकारी देवरी आणि परिचालक प्रणय उमक जखमी बैलावर उपचार करीत आहेत.
सदर प्राण्याला जीवनदान देण्यासाठी सोमण चव्हाण , धनीराम ताराम , गोलू गुप्ता , कुणाल कत्रे , संकेत गुप्ता , राहुल खैरे , तुषार मानकर , विक्की कटोरे आदी मित्र मंडळींनी प्रयत्न करीत आहे. वृत्त लिहीत पर्यंत प्राण्याच्या जखमांवर टाके लावण्याचे काम सुरु होते.