मोदी सरकारची आठ वर्ष; भाजपकडून देवरी तालुक्यातील आरोग्य सेविकांच्या सत्कार

डॉ. सुजित टेटे @प्रहार टाईम्स
देवरी 06:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ८ वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने येत्या २६ मे रोजी देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जुन महिन्यात मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे तीन वर्ष देखील पुर्ण होत आहे. या निमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेत ‘एनडीए’ने देशाचा कारभार हाती घेतला होता. सत्तेवर येताच भाजपने अनेक लोककल्याणकारी कार्यक्रमांची अंमलबजावणी केली. मोदी सरकारने देशात उज्वला, जनधन, हर घर नल सारख्या अनेक योजना सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्याचा दावा भाजपने केला आहे.

सदर कामाची प्रेरणा घेऊन देवरी तालुक्यातील भाजप पक्षाद्वारे आरोग्य विभागात अविरत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचे पंचायत समिती देवरी येथे सत्कार करण्यात आले.

सदर कार्यक्रमात भाजपचे प्रमुख अतिथी माजी आमदार संजय पुराम , नवनियुक्त सभापती अंबिका बंजार, उपसभापती अनिल बिसेन , नितेश वालोदे , पंचायत समिती सदस्य मंचावर उपस्थित होते.
यावेळी आरोग्य सेविका पी. डी. बोरकर,
एस. एस. जोरांडे, एस.एस. थोटे , सी.डी. पटले, ए . आर . शंभरकर , के एन. ढोमणे , एम. व्ही. नखाते, नम्रमा मंगले,एस. ए. अहीर , व्ही. वाय गिलोरकर , के. डी. मेश्राम , एस. के. खेडकर , पि.के खान , शारदा शहारे. आदी आरोग्य सेविकांचे सत्कार करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय भागवतकर यांनी केले असून आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी , सेविका यावेळी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share