३० जूनपर्यंत अंगणवाड्या सकाळपाळीत, सविता पुराम यांच्या सुचनेवरून विभागाचे आदेश

देवरी 05: तापमानाचा आरोग्यावर होत असलेल्या परिणाम लक्षात घेत महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सविता पुराम यांनी अंगणवाडी केंद्र ३० जूनपर्यंत सकाळपाळीत भरविण्यात यावे, अशा सुचना केल्या. यानुरूप महिला व बालकल्याण विभागाकडून तसे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे ३० जूनपर्यंत अंगणवाडी सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत भरणार आहेत.

उन्हाळी तापमान व उष्माचा प्रभाव लक्षात घेत १५ मार्चपासून ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील अंगणवाड्या सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भरविण्याचे आदेश देण्यात आले होते. दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू रहायचे. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून सुर्यदेव आग ओकत आहे. या वाढत्या तापमानाच्या पाऱ्याने बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेत विषय समितीच्या सभापती सविता पुराम यांनी ३ जून रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत अंगणवाड्या ३० जूनपर्यंत सकाळी त्यानरूप जिल्ह्यात अंगणवाडी केंद्र ७ ३० ते १० वाजेपर्यंत भरविण्यात यावे, अशा सुचना केल्या आहेत. या अनुसंगाने जि. प. च्या महिला व बालकल्याण विभागाने ३ जून रोजी सर्व अंगणवाड्यांना ३० जूनपर्यंतच सकाळी १० वाजेपर्यंतच अंगणवाडी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर १ जुलैपासून पुर्ववत सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अंगणवाडी सुरू राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Share