दिपाली सय्यदच्या विरोधात देवरी भाजप महिला आघाडीची तक्रार
प्रहार टाईम्स
देवरी – भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विषयी अवाच्य आणि गलिच्छ शब्दात वक्तव्य करुन व्हिडिओ तयार केल्याबद्दल शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांच्या विरोधात देवरी तालुका भाजप महिला आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्षा देवकी मरई यांच्या नेतृत्वाखाली ३१ मे ला स्थानिक पोलीस स्टेशनला लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे.
देशाचे प्रधानमंत्री कोणत्याही राजकीय पक्षाद्वारे निवडून आलेले असोत ? एकदा पद ग्रहण केल्यानंतर ते त्या पक्षाचे नसून भारतीय घटनेच्या अंतर्गत देशाचे सर्वोच्च पद असलेले प्रधानमंत्री असतात. त्यामुळे, त्यांच्या विरोधात बोलताना, वक्तव्य करताना, एखादा मॅसेज किंवा व्हिडिओ तयार करताना मर्यादेचे बंधन आवश्यक असताना सुद्धा शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी नको त्या शब्दात अशा अवाच्य आणि गलिच्छ शब्दात २६ मे ला वक्तव्य केल्या प्रकरणी देवरी तालुका भाजप महिला आघाडीच्या वतीने ३१ मे ला स्थानिक देवरी पोलिस स्टेशनला तालुकाध्यक्षा देवकी मरई यांच्या नेतृत्वाखाली लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे.
यावेळी जि. प. सभापती सविता पुराम, पं. स. सभापती अंबिका बंजार, नगर पंचायत उपाध्यक्षा प्रज्ञा संगीडवार, माजी नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, शहर अध्यक्षा माया निर्वाण, पं. स. सदस्या ममता अंबादे, वैशाली पंधरे, सरपंच अंजू बिसेन, नगर पंचायत सदस्या नूतन सयाम, कमल मेश्राम, रचना उजवने आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.