गोरेगावच्या नितीश डोमळे ची UPSC परीक्षेत बाजी, देशातून 559 वी रँक
Gondia 30: जिल्हातील गोरेगाव येथील नितीश दिलीपकुमार डोमळे यांने आज UPSC परीक्षेच्या जाहिर झालेल्या निकालात 559 रँक प्राप्त करीत यश संपादन केले आहे.नितीशची निवड IAS /IPS करीता होणार आहे. नितीशचे आई सौ. उषा डोमळे आणि वडील दिलिप डोमळे दोन्ही शिक्षक आहेत. वडील पी.डी.राहांगडाले विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. नितीश ने आपल्या यशाचे श्रेय आई वडील , मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना दिले आहे. नितिशने मिळवलेल्या यशाने ग्रामीण भागात शिक्षण घेतलेले विद्यार्थी सुद्धा जिद्द आणि कठीण परीश्रमातून देशाच्या सर्वोच्च परीक्षेत यश संपादन करू शकतात हे सिध्द करून दाखविले आहे. सदर यशामुळे गोंदिया जिल्हाच्या पेचात मानाचा तुरा रोवला आहे. गोंदिया सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातून देशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणे मोठी गोष्ट आहे. सर्व स्तरावरून नितीश चे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.