गोंदिया जिल्हात मान्सूनची हजेरी, अखेर पुणे वेधशाळेचा अंदाज खरा ठरला

◼️बालगोपाळांना पहिल्या पावसाचा आनंद लुटला

देवरी 30: नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे हालचाल मंद गतीने सुरू असून मोसमी वारे पुढच्या दोन ते तीन दिवसांत केरळ प्रांतात दाखल होतील, असा अंदाज हवामान विभाग यांच्याकडून व्यक्त केला होता.मोसमी वारे दाखल होण्याच्या या कालावधीत सोमवारपासून राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर वेधशाळेचे अंदाज खरे ठरले असून. जिल्हात पावसाची एन्ट्री मारली आहे. जिल्हातील देवरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहिल्या पावसाचा आनंद बालगोपाळांनी चांगलाच घेतला असून, शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share