गुडन्यूज! कृषी उत्पादनांची वाहतूक गोंदियावरुन विमानाद्वारे सुरु होणार..

गोंदिया १५:

जिल्ह्यातील उत्पादने हवाई मार्गाद्वारे कमी वेळात बाजारपेठेत पोहचवून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा आर्थिक विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवून खासदार मेंढे हे केद्र शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. ह्या कामाचा एक भाग म्हणून आज बिरसी विमानतळ येथे खा.मेंढे यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेण्यात आली. त्

सदर बैठकीमध्ये जिल्ह्यातील फळ उत्पादनांसाठी लागवडी खाली असलेल्या क्षेत्राचा तसेच २०१९-२० ह्या वर्षातील फळ उत्पादनाचा आढावा घेण्यात आला.एकट्या गोंदिया जिल्ह्यातून ९८३८ मे.टन. चे उत्पादन – आंबे , टरबुज, सीताफळ, पेरू इ. फळांचे उत्पादन घेण्यात आले. सदर उत्पादने स्थानिक बाजारपेठे सोबत नागपूर व जबलपूर येथे पाठविल्या जातात. तसेच भेंडी, काकडी, टोमॅटो, कारली इ. फळ भाज्याचे निर्यातक्षम उत्पादने वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. कृषी अधिका-याकडून जिल्ह्यातील प्रगतीशील शेतक-यांची यादी ही मागविण्यात आली.

सदर नाशवंत उत्पादने विमान वाहतुकीद्वारे कमी वेळात बाहेरील बाजारपेठेत पाठवणे शक्य होणार आहे. ह्या संदर्भात गोंदिया विमान प्राधिकरण गोंदिया येथे झालेल्या बैठकीत ह्या विषयाची माहिती खा.मेंढे यांनी संबंधिताना दिली. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्याच्या उद्देश ह्याद्वारे सफल होणार आहे.

हयावेळी विमानपतन निर्देशक विनयकुमार ताम्रकार, भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष संजयसिंह टेंभरे, गजेंद्र फुंडे विमानतळ सल्लागार समिती चे सदस्य, तसेच हेमेंद्र टेंभरे राजेश कापगते,प्रखर दिक्षित, मिलिंद शेवाळे, महेद्र ठाकूर, कोमलजी साठवणे, अशोककुमार हरिणखेडे, घनश्याम चौधरी, प्रशांत कटरे, उमेंद्र बिसेन, प्रवीण बिसेन, अलोक चौधरी, रामलाल पटले इ. उपस्थित होते

Share