आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

गोंदिया: शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पालकांच्या पाल्यांच्या नामांकित इंग्रजी शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश योजनेतंर्गत प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार 19 मेपासून सुरुवात झाली आहे. निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश करून घेण्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) कादर शेख यांनी केले आहे. बालकाचा मोफत व सक्तीचा RTE शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये वंचित व दुर्बल घटकातील पालकांकरिता इंग्रजी माध्यम विना अनुदानित शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांना शुक्रवार 19 मे पासून तालुकास्तरावर प्रत्यक्ष प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे.

पालकांनी तालुक्याचे गटसाधन केंद्रस्थळी जाऊन आवश्यक दस्ताऐवजांच्या मुळ दस्ताऐवज व छायांकित प्रती सोबत घेऊन जाऊन प्रवेश निश्चित करावे. प्रवेशावेळी रहिवासी पत्त्याचा पुरावा, अर्ज भरतांना दर्शविलेले अंतर दस्ताऐवजांची तपासणी तालुकास्तरावर करण्यात येणार असून चुकीची माहिती आढळून आल्यास तालुका तपासणी समितीकडून शहानिशा करून प्रवेश देण्याचे अधिकार तालुका दस्ताऐवज तपासणी समितीकडे अबाधित ठेवण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे. जिल्हयातील 143 शाळांमध्ये पहिल्या फेरी अंती 600 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. 213 विद्यार्थ्याकरिता प्रतिक्षा यादीतील बालकांना 19 मे रोजी दुपारी 3 वाजतानंतर निवड झाल्याचे संदेश पालकांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आले आहे. पालकांनी भ्रमणध्वनी संदेशावर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पाहावी. 19 ते 27 मे 2022 या कालावधीमध्ये कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचे आभासी प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ) कादर शेख यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share