Viral Video: आदिवासी लोकनृत्यावर वर वधूचे भन्नाट नृत्य , परंपरा जपण्याचा दिला लोकनृत्यातून संदेश

प्राचार्य डॉ. सुजित टेटे

देवरी 21: आदिवासी नक्षलग्रस्त भाग म्हणून गडचिरोली , गोंदिया जिल्हाची ओळख आहे. बहुतांश डोंगराळ आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या या आदिवासी ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात आदिवासी जमातीचे लोक वास्तव्य करतात. दिवसेंदिवस पाश्चिमात्य संस्कृतीने लग्न कार्य आणि आपल्या पारंपारिक संस्कृतीवर प्रभाव पडलेला असून आजची तरुण पिढी परंपरा आणि संस्कृतीला विसरत चालत असतांना एका लग्न सोहळ्यात वर वाढून आदिवासी लोकनृत्यात लोकप्रिय असलेल्या रेला रे लोकगीतावर भन्नाट नृत्य करीत पाहुण्यांचे आणि आदिवासी भागातील लोकांचे लक्ष वेधले आहे. सध्या हा विडिओ गोंदिया , गडचिरोली , चंद्रपूर जिल्हात चांगलाच viral होत असून चर्चेचा विषय बनला आहे.

Share