निवासी शाळांमध्ये तासिका शिक्षकांची नियुक्तीकरीता अर्ज आमंत्रित

गोंदिया,दि.20 : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गोंदिया जिल्हयातील कार्यरत असलेल्या मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा, नंगपुरा मुर्री, सरांडी व डव्वा या शाळांमध्ये वर्ग 6 वी ते वर्ग 10 वी च्या अभ्यासक्रमासाठी निवासी शाळांमध्ये नियमित सहाय्यक शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत तसेच प्रवेशित गुला-मुलींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात तासिका शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. सदर शिक्षकांना घडयाळी तासिकाप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे.
शासकीय मुलांची निवासी शाळा नंगपूरा (मुर्री), ता. गोंदिया येथे वर्ग 6 वी ते 8 वी करीता-01 पद, शैक्षणिक पात्रता बी.एस्सी (विज्ञान/गणित) डी.एड/बी.एड, वर्ग 9 वी ते 10 वी करीता-02 पद, शैक्षणिक पात्रता बी.ए., एम.ए. (मराठी, हिंदी, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण, संगीत), व मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा येथे वर्ग 6 वी ते 8 वी करीता-01 पद, शैक्षणिक पात्रता बी.ए.बी.एस्सी. डी.एड. वर्ग 9 वी ते 10 वी करीता-01 पद, शैक्षणिक पात्रता बी.ए.एम.ए. बी.एड. तसेच गुलींची शासकीय निवासी शाळा, डव्वा, ता. सडक अर्जूनी येथे वर्ग 6 वी ते 10 वी करीता-03 पद, शैक्षणिक पात्रता बी.ए./एम.ए.बी.एड संगित विशारद, बी.ए.बी.पी.एड. क्रिडा शिक्षक, बी.एफ.ए., एम.एफ.ए. कला शिक्षक, वर्ग 9 वी ते 10 वी करीता-01 पद, शैक्षणिक पात्रता बी.ए.,एम.ए.बी.एड. मराठी विषयासह. करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत
आहेत.
तरी इच्छूक प्रशिक्षीत उमेदवारांनी संबंधित शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापकाकडे सर्व कागदपत्रासह अर्ज दिनांक 25 मे 2022 पर्यंत सादर करावे. (अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल). तसेच मुलाखतीसाठी दिनांक 02 जून 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे मूळ सर्व कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे. असे आवाहन डॉ.मंगेश वानखडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गोंदिया यांनी केले आहे.
00000

Print Friendly, PDF & Email
Share