रब्बी हंगामातील शेतकरी नोंदणीकरीता 31 मे पर्यंत मुदतवाढ

गोंदिया,दि.20 : शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2021-22 मधील धान खरेदीकरीता 11 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याकरीता शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली होती. परंतू सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे काही शेतकरी नोंदणी पासून वंचित राहिलेले होते, त्यामुळे रब्बी हंगामात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करता येत नव्हते. त्यानुषंगाने शासन पत्रान्वये NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणीकरीता शासनाकडून 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
तरी जे शेतकरी NEML पोर्टलवर शेतकरी नोंदणी पासून वंचित आहेत त्यांनी नजिकच्या शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर स्वत:चे चालु हंगामाचे 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करुन 31 मे 2022 पर्यंत शेतकरी नोंदणी करावी व शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. असे जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांनी कळविले आहे.
00000

Print Friendly, PDF & Email
Share