आ. कोरोटे यांची धान खरेदीवर मुंबईत चर्चा

देवरी 19: जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीची प्रक्रीया रेंगाळी आहे. प्रति हेक्टरी धान खरेदी मर्यादा कमी करण्यात आली आहे. अद्यापही धान खरेदीला सुरवात झाली नसल्याने शेतकर्‍यांना अल्प किमतीत धान विक्री करावा लागत आहे. शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये, मुदतीत धान खरेदी व्हावी, विना विलंब धान खरेदी करावी व धान खरेदीतील विविध अडचणींवर स्थानिक आमदार सहषराम कोरोटे यांनी मुंबई येथे मंगळवार 18 मे रोजी बाळासाहेब पाटील सहकार व पणनमंत्री आणि अन्न व पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रतिहेक्‍टरी 43 क्विंटल धान खरेदी करण्याचे सुधारित आदेश काढण्यात यावे करिता निवेदन दिले.

यावेळी आमदार कोरोटे यांनी शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत वाघमारे यांना अवगत केले. उन्हाळी धान खरेदी हेक्टरी मर्यादा 43 क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वाघमारे यांनी सांगीतले.

Share