नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येणार चार वाघ

गोंदिया: व्याघ‘ दर्शनासाठी सुपरिचित असलेल्या जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ‘ प्रकल्पात व्याघ‘ संवर्धनातील स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब‘ह्मपुरी येथील चार वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ‘ प्रकल्पात सोडण्याचा निर्णय राज्याच्या नवविभागाने घेतला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून मे महिन्याच्या अखेरीस यातील दोन वाघिणींना या व्याघ‘प्रकल्पात सोडण्याचे संकेत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले.

गेल्या काही वर्षांत राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष प्रचंड वाढला आहे. 2021 मध्ये या संघर्षांत 84 जण प्राणास मुकली आहेत. त्यानंतर राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वाघांच्या संवर्धन स्थानांतरणाला हिरवा कंदील मिळाला. त्यासाठी जागांची शोधमोहीम राबवण्यात आली. नवेगाव-नागझिरा व्याघ‘प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नवगाव-नागझिरा व्याघ‘प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची सं‘या समांतर नाही. त्यामुळे येथे चार वाघीण सोडून ही सं‘या समांतर करण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

नवेगाव-नागझिरा व्याघ‘प्रकल्पात सोडण्याचा निर्णय झालेल्या वाघिणी दीड ते दोन वर्षांच्या असून गेल्या सहा महिन्यांपासून देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब व त्यांची चमू त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. या वाघिणींना काही दिवस खुल्या पिंजर्‍यात ठेवून मग रेडिओ कॉलर लावून नवेगाव-नागझिरा व्याघ‘प्रकल्पात सोडले जाईल. बिलाल हबीब हा संपूर्ण प्रकल्प हाताळत असून स्वयंसेवी संस्थांचीही यासाठी मदत घेतली जात असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगीतले.

Print Friendly, PDF & Email
Share