समग्र शिक्षा कर्मचारी/ विषयसाधनव्यक्ती संघटनेने केले नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे ‘बांबू ट्री’ देऊन स्वागत

◼️जिल्हा प्रशासन नेहमी सहकार्य करेल; जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांचे आश्वासन

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची समग्र शिक्षा कर्मचारी/ विषयसाधनव्यक्ती प्रदेश महासंघ जिल्हा गोंदिया द्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली व बोन्साय बांबू ट्री भेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.

भेटीच्या वेळी विविध विषयांवर तिन्ही महोदयांशी चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये विशेष करून मागील 2017-18 पासून मानधनात वाढ झाली नसल्याने सर्व कंत्राटी कर्मचारी यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बजेटमध्ये देखील एक रुपयांची ही वाढ करण्यात आली नाही करिता जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाशी व एमपीएमपीशी जिल्हा प्रशासनाकडून योग्य तो पत्रव्यवहार करण्यात यावा. सर्व कर्मचारी हे मागील 15 ते 20 वर्षांपासून कंत्राटी म्हणून अतिशय कमी मानधनावर जिल्हा परिषदेत सेवा देत आहेत, त्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक ठराव राज्य सरकारला पाठवावे अशीही विनंती करण्यात आली. सर्व विषयावर योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी अध्यक्ष पंकज रहांगडाले व उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी संघटनेला दिले आणि जिल्ह्यातील गोरगरीब मुलांचे चांगले शिक्षण व्हावे, त्यांना शासनाच्या सर्व शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यात हयगय खपवून घेतली जाणार नाही अशी सुचनावजातंबीही दिली. तसेच आपण दिलेली भेट नेहमी माझे टेबलावर राहील व आपल्या मागण्यांबाबत मला आठवण करून देईल असेही मिस्कीलपणे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी म्हटले.

भेटीच्या वेळी विषयसाधनव्यक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील बोपचे, साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, सुनील ठाकूर, भास्कर बहेकार, विनोद परतेके, भाऊलाल चौधरी तसेच समग्र शिक्षा कर्मचारी अर्जुनी मोरचे लेखापाल कोपुलवार, SSA जिल्हा कार्यालयातील सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, लेखाधिकारी वाहने जी, कनिष्ठ अभियंता विकास कापसे, वाहन चालक संजय गालपल्लीवार उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share