समाज बांधवांनी उत्साह प्रेमी होण्यापेक्षा आचरण प्रेमी व्हा: आ. कोरोटे
■ देवरी येथील उरवेलावन बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी
देवरी १८: विश्वातील मानव जातीच्या उत्थानासाठी प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्रीचा संदेश महाकारुनिक तथागत गौतम बुद्धान्नी दिला. बुद्ध धम्म हा विज्ञानावर आधारीत शास्त्र शुद्ध धम्म आहे. या धम्मात अंधश्रद्धेला वाव नाही. या धम्मातील प्रत्येक गोष्टी मानव विकासाला पूरक असून सुखी संपन्न जीवन जगन्यासाठी सहाय्यक ठरनारी आहे. त्यासाठी समजबांधवांनी उत्साहप्रेमी होण्यापेक्षा आचरनप्रेमी होण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
आमदार कोरोटे हे देवरी येथील उरवेलावन बौद्ध विहारात सोमवारी (ता.१६ मे) रोजी आयोजीत भगवान गौतम बुद्ध जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथिच्या रुपात बोलत होते.
यावेळी सर्वप्रथम आमदार कोरोटे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करुण बुद्ध वंदना घेण्यात आली व भगवान गौतम बुद्धांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष जैपाल शहारे, सचिव रूपचंद जांभुळकर, युवक काँग्रेसचे देवरी शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, समता सैनिक दलाचे अध्यक्ष ताराबाई टेंभूर्रकर, नीलध्वज आकरे, मनोहर तागड़े, रूपेश टेंभूर्रकर, वन्दनाताई राऊत, श्री.शहारे, श्री.राऊत यांच्यासह परिसरातील समाज बांधव, शहरवासी व काँग्रेसचे पदाधिकरी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.