घरफोडी प्रकरणातील दोन आरोपी गजाआड,आमगाव पोलिसांची कारवाई

गोंदिया ■ आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत १० मे रोजी धावडीटोला येथे अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी राजेशकुमार श्यामचरण कुंभलवार यांचे घरफोडून ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची नोंद आमगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली. तपासकार्य हाती घेवून दोन संशयीतांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांची कसून चौकशी केली असता, त्या दोन्ही आरोपींनी घरफोडी केल्याची कबूली दिली. आरोपींकडून २१ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. करण गजानन कुंभलवार रा. धावडीटोला, नितेश विलास गणवीर रा. भवभुतीनगर आमगाव असे आरोपींची नावे आहेत.

सविस्तर असे की, धावडीटोला येथील राजेशकुमार कुंभलवार हे ८ मे रोजी लग्न कार्यासाठी बाहेर गेले होते. दरम्यान संधी साधून आरोपींनी घरफोडी केली. सोन्या- चांदीचे दागिने व रोख असा एकूण आले. ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही बाब १० मे रोजी राजेशकुमार कुंभलवार घरी आल्यानंतर उजेडात आली. या बाबतची तक्रार त्यांनी आमगाव पोलिस ठाण्यात केली. तक्रारीनुरूप गोंदिया येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास कार्य सुरू केले. १६ मे रोजी तपास दरम्यान आमगाव पोलिसांनी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर क़रण गजानन कुंभलवार याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता, त्याने घरफोडी केल्याची कबूली केली. तसेच चोरी केलेले दागिने आमगाव येथील निलेश विलास गणवीर याला विक्री केल्याचे सांगितले. यानुरूप निलेश विलास गणवीर यालाही ताब्यात घेण्यात आले.

एकंदरीत चोरी प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण २१ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. मनोज उघडे, पो. हवा. राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, विठ्ठलप्रसाद ठाकरे, महेश महेर, चेतन पटले, हंसराज भांडारकर यांनी केली.

Share