देवरी: घराच्या बांधकामावरील लिफ्टवरून पडलेल्या इसमाचा मृत्यू

गोंदिया • देवरी पोलिस ठाण्यांतर्गत देवरी येथे घराच्या बांधकामावरील लिफ्टवरून पडलेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटनां ७ मे रोजीची आहे. कैलाश झरियार डोंगरे (३५) असे मृताचे नाव आहे. घराचे बांधकाम करीत असतांना लिफ्टवरून कैलाश खाली पडला. त्याच्यावर देवरी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी मर्ग नोंद केला आहे.

Share