गोंदिया जिल्हा पोलीस वार्तापत्र

दिनांक :- ०८/०५/२०२२

१) पो.स्टे. आमगाव :- दुखापत

प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ०४/०५/२०२२ चे ०९:०० वा. दरम्यान मौजा दुर्गा मंदिरच्या मागे वार्ड क्र. ०३ आमंगाव येथे यातील फिर्यादी गोवर्धन गणेश रहीले वय ३० वर्ष रा. वार्ड क्र. ०३ आमंगाव, ता. आमंगाव, जि. गोंदियां हा आपला मित्र आतीस तरोने सोबत हळदीच्या कार्यक्रमात जेवण करीत असतांनी आतीस तरोने याचा पाय एका मुलीला चुकीने लागला असता आरोपी क्र ०३ याने आतीस यास ‘तेरे घर मे माँ बहन नहीं है क्या, इसको धक्का क्यु दिया’ असे बोलुन शिवीगाळ देत होता. तेव्हा फिर्यादीने आरोपी क. ०३ ला कशाला शिवीगाळ करतो असे हटकले असता आरोपी क्र ०३ व ०४ यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या मित्राला ‘दोघेही सारखेच आहात‘ असे बोलुन शिवीगाळ करून दुर्गा मंदिरच्या मागे नेवुन अरोपीतांनी संगणमत करून आरोपी क्र. ०१ व ०२ यांनी बल्लीने फिर्यादीच्या डोक्यावर, डाव्या पायावर, पाठीवर मारले व आरोपी क्र ०३ व ०४ यांनी फिर्यादीला थापड बुक्याने व काठीने मारून जखमी केल्याने फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन व डॉक्टरी अहवरलावरून पोस्टे आमगाव येथे अप क्र. १३६ / २०२२ कलम ३२४, ५०४, ३४ भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपा पोहवा गजपुरे / ०२ पो.स्टे. आमंगाव हे करीत आहेत.

२) पो.स्टे. तिरोडा :- शासनाची फसवणुक करणे

प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ०७/०५/२००५ चे १५:१० वा पासुन ते आज पावेतो सुभाष विद्यालय मुंडीकोटा येथे यातील आरोपी याने खोटे दस्ताऐवज, खोटी मेडीकल रिपोर्ट, खोटे कागदपत्र तयार करून आरोपीने नौकरी प्राप्त करून आज पावेतो शिक्षण विभागाचे पगारा ची रक्कम उचलुन शिक्षण विभागाची व शासनाची फसवणुक केली आहे. अशा प्रकारची रिपोर्ट दाराने दिवानी न्यायालय (क स्तर) येथे तक्रार अर्ज केले असुन मा. न्यायालयाचे कागदपत्र प्राप्त झाले असुन दिवानी न्यायालय (क स्तर) तिरोडा यांचे आदेशान्वये व फिर्यादी पो हवा नरेन्द्र आसाराम आंबाडारे वय ५२ वर्ष, रा. पोस्टे तिरोडा यांचे रिपोर्ट वरून पोस्टे तिरोडा येथे अप क. ३४७/२०२२ कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७४, भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा संजु बान्ते/१२०२ पोस्टे तिरोडा, हे करीत आहेत.

३) पो.स्टे. तिरोडा :- मोटार सायकल चोरी

प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ०५/०५/२०२२ चे २४:०० वा ते दि ०६/०५/२०२२ चे ०६:०० वा दरम्यान यातील फिर्यादी राजकुमार जयराम राहागडाले वय ५७ वर्ष, रा.मेंदीपुर, ता. तिरोडा, जिल्हा गोदिया याची मौजा बिर्सी फाटा तुमसर रोड येथे आशीस इलेक्ट्रीक व श्री समर्थ कलेक्शन च्या नावाने कपडयाच्या दुकाना समोर ठेवलेली मोटार सायकल गाडी क एम एच ३५ ए एम ३२०२ काळया व लाल रंगाचे मोटार सायकल किमंती ३०,००० /- रू ची कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादच्या रिपोर्ट वरून पोस्टे तिरोडा येथे अप क. ३४८/२०२२ कलम ३७९ भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पो.ना.टेभरे पोस्टे तिरोडा, हे करीत आहेत.

४) पो.स्टे. गोंदिया शहर : • मोबाईल चोरी

प्रकरण अशा प्रकारे आहे कि, दिनांक ०५/०५/२०२२ चे २३:४५ वा ते दि ०६/०५/२०२२ चे ०६:०० वा दरम्यान आंबेडकर वार्ड सिंगलटोली गोंदिया येथे यातील फिर्यादी अभिषेक पारस बाकरकर वय २९ वर्ष, व्यवसाय डायवर आंबेडकर वार्ड सिंगलटोली भागवत गोंडाने यांचे घराजवळ ता जि गोंदिया याचा ओप्पो कंमपनीचा मोबाईल मॉडेल क्रमांक रेनो ६ जिचा आय. अम. आय नं. ८६६२२१०५२९८६२९१ किंमत २५,०००/- रु चा कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादीच्या तोंडी रीपोर्ट वरून पोस्टे गोंदिया शहर येथे अप क्र. २९२ / २०२२ कलम ३७९ भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास नापोशि मेश्राम / ५५८ पो.स्टे. गोंदिया शहर, हे करीत आहेत.

५) पो.स्टे. चिचगड :- • मोबाईल चोरी

प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ०७/०५/२०२२ चे १७:०० वा. दरम्यान मौजा चिचगड बाजार येथे यातील आरोपी व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी धनराज पंढरी कोरोंडे वय ४२ वर्ष रा भागी ता. देवरी जि. गोंदिया हा चिचगड आठवडी बाजारात बाजार करीत असतांनी त्याचे वरच्या शर्टाच्या खिशात असलेले स्वतःचे वापराचे वीवो वाय ७२ ५जी कंपनीचा मोबाईल ज्याचे आयएमईआय नं. ८६८२५१०५५८९०७९२ असुन ज्यात जियो कंपनीचा सिम क्रमांक ८७८८६०८२७९ आणि आयडीआया कंपनीचा सिम क्रमांक ९७६३८८५५०६ असलेले मोबाईल किंमती १६००० /- रू माल चोरुन नेल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोस्टे चिचगड येथे अप क. ६२ / २०२२ कलम ३७९, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास स. फौ. सोनजाल ब.नं. ५९४ पो.स्टे. चिचगड, हे करीत आहेत.

६) पो.स्टे. डुग्गीपार :- अकस्मात मृत्यु

प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ०५/०५/२०२२ चे १४:०० ते ०७/०५/२०२२ चे १०:३० वा. दरम्यान मौजा डुंडा जंगल शिवार येथे यातील मयत नामे ताराचंद उर्फ गणेश बळीराम मेंढे हा दि. ०५/०५/२०२२ चे १४:०० वा. मौजा पांढरी येथुन गुम झाला होता. सदर गुमचा शोध कामी फीर्यादीने जवळील लोकांना पाठवीले असता यातील गुम इसमाचे प्रेत गळफास लावुन एका झाडाला मृत अवस्थेत मिळुन आल्याने फिर्यादी उदाराम नारायन मेंढे वय ६९ वर्ष रा.घोटी, ता. सडक / अर्जुनी जि. गोंदिया याच्या तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे डुग्गीपार येथे अप क. २० / २०२२ कलम १७४ जाफौ अन्वये मर्ग नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा मर्गची चौकशी पोहवा सुभाष डोंगरवार / ४२४ पोस्टे डुग्गीपार, हे करीत आहेत.

Share