RTE प्रवेशासाठी अप्रूवल रिपोर्ट पाठवण्यासाठी ३० हजारांची लाच मागणारा गटसाधन केंद्रातील कर्मचारी एसाबीच्या जाळ्यात

परभणी 07: RTE प्रवेशासाठी अप्रूवल रिपोर्ट पाठवण्यासाठी ३० हजारांची लाच मागणारा गटसाधन केंद्रातील कर्मचारी एसाबीच्या जाळ्यात अडकल्याचे वृत्त आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे यंदाही आभासी पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी आभासी सोडत 30 मार्च रोजी काढण्यात आली. या सोडतीनुसार प्रवेशाच्या पोर्टलवर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी 4 एप्रिल रोजी घोषित केली. निवड आणि प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठविण्यात आले आहेत. निवड समितीची फक्त कागदोपत्री आणि नाममात्र असल्यामुळे निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांकडून पैशाची वसुली सुरु असल्याच्या चर्चा प्रत्येक तालुक्यात सुरु असतांना परभणी मध्ये ३० हजारांची लाच मागणारा गटसाधन केंद्रातील कर्मचारी एसाबीच्या जाळ्यात अडकला आहे . सदर घटनेमुळे प्रत्येक जिल्हातील गट साधन केंद्रात वसुली करणाऱ्या साधनव्यक्ती , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

बाळासाहेब सूर्यकांतराव अंभोरे असे 30 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव असून पालकांकडून RTE प्रवेशाचे अप्रूव्हल रिपोर्ट देण्यासाठी तो सर्रास पैशाची मागणी करीत होता. सदर कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षण सदानंद वाघमारे पोलीस कर्मचारी निल पत्रेवार यांच्या पथकाने केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share