पोलिसांचा भूसुरुंग रोधक वाहनाला लागली आग, जीवितहानी नाही

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलात असेलेले भूसुरुंग रोधक वाहनाला आग लागल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास आष्टी आलापल्ली मार्गावरील दीना नदीच्या पुलावर घडली असून कुठलीही हानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे . 
सविस्तर वृत्त असे कि गडचिरोली पोलीस दलात सामील असलेले भूसुरुंग रोधक वाहनाने गडचिरोली पोलीस जवान नक्षल विरोधी अभियान राबविण्याकरिता जात असताना आष्टी – आलापल्ली मार्गावरील दीनानदीच्या पुलाजवळ पोहचताच अचानक भूसुरुंग रोधक वाहनाला आग लागली होती लगेच वाहनातील जवानांनी कसलेही विचार न करता आग विझविण्याचे प्रयत्न केले .

सदर घटनेत कोणालाही कुठलेही हानी पोहचली नसून शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली

Print Friendly, PDF & Email
Share