देवरी तालुक्यात आरटीई अंतर्गत 31 बालकांना प्रवेश, 11 जागा शिल्लक

देवरी 06: शिक्षण हक्क कायद्यानुसार RTE तालुक्यातील नामांकीत खासगी शाळांमध्ये आजपर्यंत 44 जागापैकी 31 बालकांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. उर्वरित राखीव 11 जागांवरील प्रवेशासाठी आता 10 मे 2022 पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्यासाठी आणखी कालावधी मिळाला आहे.

RTE आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे यंदाही आभासी पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी आभासी सोडत 30 मार्च रोजी काढण्यात आली. या सोडतीनुसार प्रवेशाच्या पोर्टलवर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी 4 एप्रिल रोजी घोषित केली. त्यात जिल्हातील 802 विद्यार्थ्यांची निवड यादी तसेच 223 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली.

निवड आणि प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठविण्यात आले आहेत. निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी सुरवातीला 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती, त्यानंतर 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ मंगळवार 10 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ही अंतिम मुदतवाढ असल्याचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांनी सांगीतले.

Print Friendly, PDF & Email
Share