आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील मुस्लिम कब्रस्तानच्या विकासाकरिता 1.10 कोटी निधी मंजूर
■ आमदार कोरोटे यांच्या पाठपुरावा व प्रयत्नाला यश
देवरी ०६ ◼️आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, सालेकसा व आमगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील मुस्लिम समाजातील लोकांना मूलभूत सोई व सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान ऊंचावन्याकरिता अनेक दिवसांपासून मागणीत असलेल्या विषयाला गृहीत धरून या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी सतत शासनाशी पाठपुरावा व प्रयत्न केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेवून राज्याच्या अल्पसंख्यांक निधितुन विधानसभेच्या तिन्ही तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या विकासाकरिता १ कोटि १० लक्ष रूपयाचे निधि मंजूर केला. हा निधि आमदार कोरोटे यांच्या सतत पाठपुरावा व प्रयत्नामुळे मंजूर झाल्याने त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले आहे.
यात सविस्तर असे की, आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, सालेकसा व आमगांव तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या मुस्लीम समाजाच्या लोकांकरिता मूलभूत सोई व सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान ऊंचावन्याकरिता सदर तिन्ही तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील मुस्लिम समाजातील लोकांची बरेच दिवसापासून कब्रस्तानाच्या विकासाची मागणी होती. या अनुसंघाने या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी शासनस्तरावर सतत पाठपुरावा व प्रयत्न करुण अखेर महाविकास आघाडी सरकार कडून अल्पसंख्यांक निधितुन १ कोटि १० लक्ष रूपयाची निधि मंजूर करण्यात भाग पाडले.
या निधितुन देवरी तालुक्यातील ककोडी येथे १५ लक्ष, चिचगड करिता २५ लक्ष, डवकी येथे १० लक्ष, तर सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे २५ लक्ष व सालेकसा येथे २० लक्ष रूपयाची निधि कब्रस्तानाची आवारभिंत व आंतरित रस्ते करिता तसेच आमगांव येथे कब्रस्तान पेपर वॉक (गट्टू) व आवारभिंत बांधकामाकरिता १५ लक्ष रुपये असे एकूण १ कोटि १० लक्ष रूपयाचे बांधकाम होणार आहे.
तरी देवरी, सालेकसा व आमगांव तालुक्यातील मुस्लिम समाजातील लोकांच्या कब्रस्तानाच्या विकासा करिता १ कोटि १० लक्ष रूपयाची निधि शासनाकडून मंजूर करुण दिल्याबद्दल क्षेत्रातील मुस्लिम समाजाने आमदार सहषराम कोरोटे यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे.