देवरी पंचायत समितीवर भाजप चा झेंडा, सभापती पदी अंबिका बंजार, तर अनिल बिसेन उपसभापती
◼️प्रा.डॉ. सुजित टेटे @प्रहार टाईम्स
देवरी 06 –पंचायत समितीच्या आज होऊ घातलेल्या सभापती उपसभापती निवडणुकीत देवरी पंचायत समिती मध्ये सभापती पदासाठी अंबिका बंजार आणि उपसभापती पदासाठी अनिल बिसेन यांची निवड झाली असून माजी आमदार संजय पुराम , भाजपचे अनिल येरणे , प्रमोद संगीडवार , महेश जैन , इंद्रजित सिंग भाटिया , प्रवीण दहीकर , यांच्या सह भाजप च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवडून आलेले सर्व सदस्य उपस्थित होते.
देवरी पंचायत समितीच्या एकूण १० जागांसाठी निवडणूक झाली होती यापैकी ६ जागांवर भाजपने विजय प्राप्त करीत सत्तेच स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर काँग्रेसला ४ जागांवर समाधानी व्हावे लागले. या पंचायत समितीमध्ये राकाँला खातेही उघडता आले नव्हते.
भाजप ने स्पष्ट बहुमत मिळवीत पंचायत समितीवर आपला झेंडा रोवला असून सभापती आणि उपसभापती पदाची निवड करण्यात आली आहे. भाजप च्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोलतास्याच्या तालावर विजय जल्लोष साजरा केला.