देवरी: अपघातात गंभीर शिक्षकाच्या उपचारासाठी सरसावले मदतीचे हात , तालुक्यातील शिक्षकांचा पुढाकार

देवरी 06: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देऊळगाव केंद्र चिचगड , तालुका देवरी येथे कार्यरत शिक्षकाचा डुग्गीपार जवळ राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबासह भीषण अपघात झाला त्यामध्ये तुळशीदास मेश्राम गंभीर जखमी असून अपघातात पत्नी व 2 मुले मृत झाले. यांच्या उपचारासाठी तालुक्यातील शिक्षक बांधवानी मदतीचा हात दिला असून सर्व स्तरावरून मदत मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांचा उपचार नागपूर येथील खाजगी रुग्णालयात सुरु आहे

प्राप्त माहिती नुसार तुलसीदास मेश्राम प्राथमिक शाळा देवलगाव ( चीचगड ) शिक्षक यांचा भंडारा वरून परिवार सोबत येत असताना शसेकरण घाट येथे अपघात पत्नी व 2 मुले जागीच ठार झाले. लाखांदूर तालुक्यातील मु.घरतोडा पो.सरांडी येथील मूळचे रहवासी आहेत. गरीब परिस्थितीमधून शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षक झाले. सकाळी चीचगड वरून मित्राच्या घराचे वास्तू पूजन आहे म्हणून परिवारा सोबत भंडारा येथे गेले. सायकाळी 4:00 वाजता भंडारा वरून निघाले देवरी ला येत असता शसेकरण घाटमध्ये हा दुर्दैवी अपघात झाला.

Print Friendly, PDF & Email
Share