Breaking: देवरीच्या शिक्षकाचा कुटुंबासह भीषण अपघात, पत्नी व 2 मुले ठार

देवरी 05: राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झालेली असून आज देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देऊळगाव केंद्र चिचगड , तालुका देवरी येथे कार्यरत शिक्षकाचा कुटुंबासह भीषण अपघात डुग्गीपार जवळ राष्ट्रीय महामार्गावर झाला असून यामध्ये तुळशीदास मेश्राम गंभीर जखमी असून अपघातात पत्नी व 2 मुले मृत झाले असल्याचे वृत्त आहे .मृतकांमध्ये चिन्मय तुळशीराम मेश्राम (वय 6 वर्ष), प्रीती तुळशीराम मेश्राम (वय 34 वर्ष) तर एक 12 वर्षाचा मुलाचा समावेश आहे. वडील तुळशीराम रामा मेश्राम वय 45 यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटने मुळे देवरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे .

प्राप्त माहिती नुसार तुलसीदास मेश्राम प्राथमिक शाळा देवलगाव ( चीचगड ) शिक्षक यांचा भंडारा वरून परिवार सोबत येत असताना शसेकरण घाट येथे अपघात पत्नी व 2 मुले जागीच ठार झाले. लाखांदूर तालुक्यातील मु.घरतोडा पो.सरांडी येथील मूळचे रहवासी आहेत. गरीब परिस्थितीमधून शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षक झाले. सकाळी चीचगड वरून मित्राच्या घराचे वास्तू पूजन आहे म्हणून परिवारा सोबत भंडारा येथे गेले. सायकाळी 4:00 वाजता भंडारा वरून निघाले देवरी ला येत असता शसेकरण घाटमध्ये हा दुर्दैवी अपघात झाला.

Print Friendly, PDF & Email
Share