आत्मनिर्भर भारत बनवण्याची जबाबदारी गुणवंत विद्यार्थ्यांची

◼️11 वी निकाल पत्र वितरण कार्यक्रम

स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथील वर्ग 11 वी कला वाणिज्य व विज्ञान विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा धनंजय गिरहेपूंजे, प्रा योगराज डोरलीकर, प्रा. अशोक गायधनी, प्रा एकता पऱ्हाड, प्रा पद्मजा कुलकर्णी, प्रा प्रशांत वंजारी उपस्थित होते.

अकरावी कला विभागातून लक्ष्मी भोयर, सलोनी दखणे, अदिती गिरहेपूंजे, वाणिज्य विभागातून पूजा कान्हेकर, मयुरी हंबरे, ज्ञानेश्वरी किरमकार, व विज्ञान विभागातून पर्णवी गायधनी, निकिता गायधनी, कोयना फुलसुंगे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला असून प्राचार्यांच्या हस्ते त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शक यात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आत्मनिर्भर भारत बनवण्याची जबाबदारी गुणवंत विद्यार्थ्यांची आहे असे बोलत विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत घेऊन नुसते पुस्तकी अभ्यासावरच न राहता प्रत्यक्ष जीवनात प्रात्यक्षिकाद्वारे स्वतःला तयार करणे ही गरजेचे आहे. आता गुणवंत विद्यार्थ्यांकडून भारताचे नेतृत्व करून देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी करणे गरजेचे झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर द्यावी असे ते यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रा धनंजय गिरहेपूंजे, प्रा योगराज डोरलीकर, प्रा. अशोक गायधनी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते. तसेच प्रा प्रवीण पटले, प्रा रविकुमार गुरूनाणी, प्रा अजिंक्य भांडारकर, प्रा डोंगरे, प्रा धांडे, प्रा पोटभरे या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा सुरेश केदार यांनी केले तर आभार प्रा रीना साठवणे यांनी मानले. ◼️◼️◼️◼️

Print Friendly, PDF & Email
Share