देवरी येथे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव थाटात साजरा

देवरी ०५ ◼️ देवरी येथे सर्वभाषी ब्राम्हण समाज देवरी तालुकाच्या वतीने ब्राम्हण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री. परशुराम यांचा जन्मोत्सव मंगळवार( ता.०३ मे) रोजी देवरी येथील राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृहात मोठ्या थाटात व उत्सावात साजरा करण्यात आला. या निमित्य शहरात श्री परशुराम यांची शोभायात्रे सह रैली काढून जय घोष केली. या जय घोषाने शहर निदानून गेले.
या जन्मोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वभाषी ब्राम्हण समाज देवरी तालुकाचे अध्यक्ष दिपक शर्मा हे होते. या प्रसंगी देवरीचे सामाजीक कार्यकर्ता संतोष तिवारी, उमाशंकर शर्मा, लालचंद शर्मा, आसाराम पालीवाल, मधुसूदन पालीवाल, पप्पू शर्मा, नर्मदाप्रसाद उपाध्याय, नितिन राजनकर, रवि ठोंम्बरे, महिला अध्यक्ष मीनाक्षी शर्मा, पिम्पलाबाई जोशी, डिम्पल शर्मा, उषादेवी तिवारी यांच्यासह तालुक्यातील ब्राम्हण समाजाचे सर्व महिला, पुरुष व युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी उमाशंकर शर्मा, संतोष तिवारी व दीपक शर्मा यांनी समाजाच्या विकासाकरिता उत्कृष्ठ प्रबोधन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल तिवारी यांनी तर संचालन कमलेश पालीवाल आणि उपस्थितांचे आभार नंदुप्रसाद शर्मा यांनी मानले.
या कार्यक्रमानंतर ब्राम्हण समाजाच्या वतीने भगवान श्री. परशुराम यांची शोभायत्रेसह रैली काढून जय घोष करित शहराच्या प्रमुख मार्गे भ्रमण केले. या रैलीत समाजातील महिला, पुरुष व युवकवर्ग बहुसंख्येने सहभागी झाले होते. या रैलीतील जय घोषाने देवरी शहर निदानून गेले होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता सर्वभाषी ब्राम्हण समाजातील महिला, पुरुष व युवकांनी सहकार्य केले.

◼️◼️◼️◼️◼️◼️◼️

Share