उन्हाळी शारीरिक बौद्धिक विकास प्रशिक्षण शिबीर व मिशन शिखर क्रॅश कोर्स कार्यक्रममाचे उदघाटन

देवरी 05: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत उन्हाळी शारीरिक बौद्धिक विकास प्रशिक्षण शिबीर व मिशन शिखर क्रॅश कोर्स कार्यक्रमाचे नुकतेच उद्दघाटन पार पडले असून यावेळी सहसराम कोरोटे आमदार आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र ,प्रमुख पाहुणे म्हणून अशोक बनकर अप्पर पोलीस अधिकारी देवरी, विकास राचेलवर प्रकल्प अधिकारी देवरी, कैलास देशमुख काँग्रेस कार्यकर्ते, नरेंद्र भाकरे प्राचार्य एकलव्य विद्यालय बोरगाव बाजार व सर्व गोंदिया जिल्ह्याचे प्राचार्य उपस्थित होते तसेच विदयार्थी व परिसरातून आलेले मान्यवर उपस्थित होते. देवरी सारख्या आदिवासी भागातील विध्यार्थ्यांना सदर शिबिराच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन करण्यात येणार असून निश्चितच त्याचा फायदा होणार आहे.

शासकीय आश्रमशाळा बोरगाव बा. येथे दिनांक 05/05/2022 रोज गुरूवारला सकाळी11.30 वाजता उन्हाळी शिबिर आणि मिशन शिखर क्रॅश कोर्स NEET व MHTCETप्रशिक्षण शिबीर उदघाटन सोहळा मा.श्री.सहषरामजी कारोटे यांचे हस्ते पार पडला . काय्रक्रमाचे अध्यक्ष आदिवासी प्रकल्प कार्यालय देवरीचे प्रकल्प अधिकारी मा.श्री. विकासजी राचेलवार तर विशेष अतिथी म्हणून मा.श्री. अशोकजी बनकर अप्परपोलास अधिक्षक देवरी ही आवर्जून उपस्थित होते . प्रमुख अतिथि म्हणून सहा. प्रकल्पअधिकारी श्री.एच. आर. सरयाम, ,सहा. प्रकल्प अधिकारी श्री.सोनवने, क्रिडासमन्वयक श्री. विजय मेश्राम तसेच  शिक्षण विस्तार अधिकारी श्री.भूसारी,श्री.पाडेकर,एकलव्य प्राचार्य श्री. हुकरे ,ग्रा. सदस्य श्री कैलास देशमुख ,पुनारांमजी तुलावी व भंडारी सर उपस्थित होते.  

  सदर प्रसंगी मा. राचेलवार यांनी मा.आमदार श्री. कोरोटे साहेब व श्री. बनकर साहेबांचे शाल ,श्रीफळ व गोंडी पेंटिंग देवून सत्कार केला.तद्नंतर आश्रमशाळेतील मुलींनी सुंदर स्वागत गीत व आदिवासी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. 

   या शाळेचे प्राचार्य व शिबिराचे आयोजक नरेंद्र भाकरे यांनी प्रास्ताविक मध्ये शिबिराच उद्देश समजावून दिला व दोन्ही शिबिराकरिता उच्च शिक्षित 10 प्रशिक्षक उन्हाळी शिबिराकरिता सर्व मुलींना ट्रॅक सूट – कराटे सूट व क्रॅश कोर्स करिता सर्वांना मोफत स्टेशनरी व NEET – MHTCET चे स्टडी मटेरियल देण्यात आल्याचे सांगितले. सोबतच आश्रमशाळेत उन्हाळी शिबिर व NEET – MHTCET शिबिर राबविण्याची कल्पना मा.विकास राचेलवार यांनी पूर्णत्वास आणली. आदिवासी समाजाविषयी संवेदनशील असणारे विकास सर कधी मिशन शिबिर तर कधी मिशन शिखर असे विविध प्रयोग करून देवरी प्रकल्पातच नाहीतर नागपुर विभागात अवघ्या एका वर्षात आपल्या कर्तुत्व शैलीतून प्रसिद् झाले. असे आवर्जून सांगितले.कधी नव्हे ते या वर्षी प्रवेश अभियान राबवून 11 आश्रमशाळेत त्यांनी अवघ्या एप्रिल महिन्यातच 1000 चे वर विद्यार्थी प्रवेश आपल्या शिक्षकाकडून करून घेतले . 

 मा. विकास सर यांनी आपल्या भाषणात जिद्दीने पेटून उठा आणि देवरी प्रकल्पातून बसलेल्या विदयार्थ्यामधून 1 तरी आयएएस अधिकारी आपण देवूया तरच माझे ही ध्येय पूर्ण होईल असे सांगितले. NEET – MHTCET परीक्षा पास करून ज्या विद्यार्थ्याची शासकीय महाविद्यालयात निवड होईल  त्याला स्वताकडून 50000 रु. किमतीचा लॅपटॉप बक्षीस दिला जाइल असे सांगीतले. एकूणच आदिवासी समाजाच्या शिक्षणाप्रती  त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. 

मा. बनकर साहेब यांनी सुंदर वकृतव शैलीत मुलींना आपला खडतर जीवन प्रसंग सांगितला केवळ B. A. शिक्षण असतांना पहिल्याच प्रयत्नात आपन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे व यश मिळविण्याकरिता कोणतीही परिस्थिति आड येत नसते म्हणून अभ्यास व स्पर्धेकरिता वेडे होण्याचे आवाहन केले. 

मा. आमदार श्री. कोरोटे यांनी सादर अभिनव उपक्रमाबद्दल व राचेलवार सर याच्या कामाबद्दल प्रशंसा  केली.  आपण आपले  आमदाराकरिता मिळणारे वेतन आदिवासी समाजाच्या शिक्षणावर कसा खर्च करतो असे सांगून मला देवरी भागातून आदिवासी समाजातून एक तरी आयएएस अधिकारी बनवायचा आहे. व त्याकरिता सर्व शिक्षकांना मुख्यालयी राहून अध्यापन करण्याचे आवाहन त्यांनी केले व मी स्वता प्रत्येक आश्रमशाळेचा दर्जा तपासणी करणार असल्याचे सांगितले.तुम्ही तुमचे मुले कुठेही शिकवा परंतु आश्रमशाळेतील मुलांचा दर्जा जर या सत्रात सुधारला नाही तर मी कुणाची गय करणार असे आवर्जून सांगितले.मुलींना सदर शिबिराची मिळालेली  संधी दुर्मिळ असून त्या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले. 

 कार्यक्रमाचे संचालन श्री.बारसागडे सर व आभार श्री.गावळ सर यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता श्री. सरोते कु. फुंडे ,बोरकर सर ,मासरकर सर , राऊत सर,दहिफळे सर,खांडवाहे सर ,ढेंगळे सर चौधरी सर,  पाटील मॅडम,ब्राम्हणकर मॅडम,अरीकर सर,टेकाडे सर, बारसे सर ,लांजेवार मॅडम,भलावी मॅडम,चौखे मॅडम ,केवटे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

◼️◼️◼️◼️

Share