डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना

सदाशिव पाटील
मो.नं.9075214102

भारत देश हे असा देश ज्या देशाने अनेक बुद्धिमान, त्यागी ,जगाला ज्ञान देणारे तत्वज्ञानी व अनेक विषयात जगाला न्याय देणारे हिरे जन्माला घातले. त्यातील एक हिरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महान पुरुषाने शून्यातून विश्व निर्मिती केली. जगातील असा महापुरुष ज्यांनी अनेक अडचणी दुःख ,त्याग व समस्यांना मात करून आपल ज्ञानाचं प्रभुत्व जगासमोर सिद्ध करून दाखवलं. खरे *डॉक्टर बाबासाहेब* समजून घेताना त्यांच्या विद्यार्थी असतानाचा जीवन प्रवास बघितला पाहिजे.

आज खरी गरज आहे त्याच्या विचाराचं आचरण करण्याची ज्या काळात ज्ञान देण्याच व घेण्याचं हे ठराविक लोकांची मक्तेदारी असताना कुठलीही शिक्षणाचे दार खुले नसताना अपमानाची वागणूक मिळून सुद्धा त्यांनी ज्ञानाची कास कधी सोडली नाही. त्यांचे लिखित साहित्य वाचताना समजत की ज्ञानाचा आवाका म्हणजे काय? ज्याच्या प्रत्येक शब्दांमध्ये ऊर्जा व प्रेरणा हे आलं कुठून तर त्यांच्या ज्ञानातून हे ज्ञान कोठून आलं तर त्यांनी केलेल्या परिश्रमातून व त्यागातून

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जसे लहान असताना समजायला लागलं त्यावेळेस पहिली समज समाजाकडून मिळणारी द्वेशदायक व अपमानास्पद वागणूक त्यांना वाटायचं आपण सगळे मानव तर सारखेच पण आम्हालाच अशी वागणूक का ?कधी खचले ना थकले त्यांना एक गोष्ट स्पष्ट माहित झाली हे बदलायची ताकद जर कशात असेल तर ती फक्त फक्त ज्ञानात
त्यांनी ठरवलं मनात भक्कम विचार करून हे विपरीत परिस्थितीमध्ये ज्ञान मिळवलं व त्या ज्ञानाच्या जोरावर काही समाज काय तर , अख्खं जग त्यांच्या विचारांनी व कार्याने कार्य यांनी प्रभावित झाल.

आज त्यांनी ज्या ठिकाणी शिक्षण घेतल , ज्या ठिकाणीअभ्यास केला ज्याठिकाणी राहिले ते प्रत्येक ठिकाण हे प्रेरणेचे स्रोत झाल आहे त्याचं कारण त्यांनी मिळवलेले ज्ञान
असा कुठला विषय नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासला नव्हता.

ब्रिटिशांनी राज्य करून आता देश सोडण्याचा विचार केला पण पुढे या देशाचं काय होईल ?हा विचार त्यांनी केला नाही व ते करणार ही नव्हते कारण ही निव्वळ त्यांच्यासाठी बाजारपेठ होती.देश स्वतंत्र झाला व एवढ्या मोठ्या देशाला एकसूत्रीपणा मध्ये ठेवन ही खूप मोठी समस्या सगळ्या समोर येऊन पडली. अनेक विचारांचे आदान-प्रदान झाल्यानंतर आता या कार्याला पार पाडण्याची ताकद फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आहे हे ठरल व ती जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. बाबासाहेबांनी संविधान निर्मितीची जबाबदारी स्वीकारली व आपल्या सर्व सभासदांना घेऊन अहोरात्र मेहनत करून या भारत देशाला एक नवीन संविधान दिलं ज्यामध्ये सगळे समान असतील. प्रत्येकाला स्वतंत्र असेल आपलं जीवन आनंदाने जगण्याचा अधिकार त्यांनी सर्व भारतीयांना दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माणसाने अंगीकारले तर तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही
या महान महापुरुषाला माझे कोटी कोटी नमन

Share