हरदोली येथे वैराग्य मुर्ती गुलाबबाबा पुण्यतिथी व श्री दत्तजयंती सोहळा;

२६ ते २९ डिसेंबरला विविध कार्यक्रम

प्रहार टाईम्स | भुपेन्द्र मस्के

देवरी 14 : तालुक्यातील हरदोली दत्त मंदिर येथे रवीवारला (दि.२६) वैराग्य मुर्ती गुलाबबाबा पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ करण्यात येणार आहे. (दि.२६) सायंकाळी १०.१५ वाजता वैराग्य मुर्ती गुलाबबाबा यांच्या समाधी स्थळावर ज्योतप्रज्वलन करून रात्रीस किर्तन व प्रबोधन होणार आहे. सोमवारला ( दि.२७). सकाळी ९:०० वाजता महाआरती ११:३० वाजता डोलीप्रस्थान व सायंकाळी ४:०० वाजता गोपालकाला व महाप्रसाद वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर मंगळवारी ( दि.२८) दत्तजयंती महोत्सवानिमित्ताने रात्री ११.१५ वाजता ज्योत प्रज्वलन मंदिर व दत्त भजन मंडळ हरदोलीच्या वतीने भक्तीमय भजनसंध्या असणार आहे. बुधवारला( दि.२९) ला सकाळी ९.०० वाजता महाआरती ११.३० ला डोलीप्रस्थान व ४.१५ ला गोपालकाला व महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़.हरदोली येथे दत्त मंदिराची स्थापना १९९४ ला करण्यात आली असून या माध्यमातून मानवतावादी, अंधश्रद्धा निर्मूलन कार्य, इ. कार्यरत करणाऱ्या वैराग्य मुर्ती श्री गुणशिंधू गुलाबबाबा पुण्यतिथी व श्री दत्तजयंती कार्यक्रमांचा भाविकांनी व जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त मंदिर हरदोली ता.देवरी जिल्हा गोंदिया यांनी केले आहे. पुण्यतिथी व जयंती महोत्सव कालावधीत कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करण्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Share