11 ते 17 डिसेंबर जागतिक सिकलसेल सप्ताह साजरा

देवरी 15- जागतिक सिकलसेल दिन ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दिनक 11 डिसेंबर ल साजरा करण्यात आला असून सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गजभिये यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी प्रामुख्याने डॉ. सचिन बनसोडे , आयुष वैद्यकीय अधिकारी व नितेश गजभिये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, उपस्थित होते.

यावेळी संघमित्रा मेश्राम सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी सिकलसेलल आजाराबद्दल संपूर्ण माहिती दिली असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश भाजीपाले औषध निर्माण अधिकारी यांनी केले असून आभारप्रदर्शन शिलेश्वरी भृगलास्तव यांनी मानला.

कार्यक्रमाच्या यशासाठी साहहायक अधीक्षक रविंद्र ढोमणे, अधिपरिचारिका पुष्पा धुर्वे, यांनी सहकार्य केला.

Share