नगरपंचायत देवरीचा अभिनव उपक्रम..

सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी प्रत्येक मंगळवारला पायी किंवा सायकलने येणे बंधनकारक अन्येथा ५०० रु दंड

माझी वसुंधराउपक्रमासाठी घेतला पुढाकार मुख्याधिकारी अजय पाटनकर यांनी काढले आदेश

देवरी १५: नगरपंचायत देवरी येथे माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत प्रत्येक मंगळवारला सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना पायी किंवा सायकल ने येण्याचे आदेश देण्यात आलेले असुन सदर आदेशाची कुणीही अवहेलना केल्यास ५००रु दंड आकारण्यात येणार असे आदेशात नमुद करण्यात आलेले आहे.

माझी वसुंधरा अभियान २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ कालावधित राबविन्यात येत असुन पर्यावरण संरक्षण हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

पर्यावरण संरक्षण करण्याच्या उद्धेशाने हा उपक्रम नगरपंचायत देवरी येथे राबविला जात असुन सर्व कर्मचारी आणि अधिकारी सहकार्य करित असल्याचे चित्र आहे.

Share