नियमबाहय “महाराष्ट्र शासन” लिहुन वाहने मार्गस्त करणाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करा: नरेशकुमार जैन

◼️परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना पत्राद्वारे केली तक्रार

गोंदिया: महाराष्ट्र राज्यातील संपुर्ण जिल्हाधिकारी व त्यांच्या अधिनस्त येत असलेल्या विभिन्न विभागातील खाते वाहनांवर नियमबाहय “महाराष्ट्र शासन” लिहुन वाहने मार्गस्त करण्यात येत असल्यामुळे नरेशकुमार स्वरुपचंद जैन यांनी परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना पत्राद्वारे केली तक्रार केली असून कारवाई ची मागणी केली आहे.

सदर तक्रारी अर्जामध्ये महाराष्ट्र राज्यातील संपुर्ण जिल्हाधिकारी यांना व त्यांच्या अधिनस्त येत असलेल्या भिन्न भिन्न विभागातील अधिकाऱ्यांना त्यांचे त्यांचे खाते वाहनांवर “महाराष्ट्र शासन” लिहण्याची कोणतीच मुभा शासनाकडुन अथवा परिवहन आयुक्त कार्यालयाकडुन देण्यात आलेली नसतांना त्यांच्याद्वारे वाहनांवर नियमबाहय “महाराष्ट्र शासन” लिहुन खाते वाहने मार्गस्त करण्यात येत आहेत ही बाब न्याय संगत नसुन मोटर वाहन कायदयाचे उलंघन करणारी आहे. हि त्यांनी समोर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कायद्यान्वते मागविलेल्या माहितीतून समोर आली आहे.

राजशिष्टाचार विभाग (सामान्य प्रशासन विभाग) महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत सर्व जिल्हाधिकारी (मुंबई व मुबई उपनगर वगळून) कार्यालयाला “अतिविशिष्ट मान्यवरांच्या परिवहन व्यवस्थेकरिता असलेले वाहन (डि. व्ही. वाहन) ( अतिविशिष्ट जसे की, मा. राष्ट्रपती, राज्यपाल, केदसरकारमंत्री/राज्यसरकारमंत्री/सर्वोच्च / उच्चन्यायालयाचे न्यायाधीस इत्यादी) डि. व्ही. वाहने उपलब्ध करून दिली आहेत त्याच डि. व्ही. वाहनाच्या पुढील व मागील बाजुस ठळकपणे “महाराष्ट्र शासन” असे लाल रंगाने रंगवुन घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त शासनाच्या कोणत्याही अन्य खाते वाहनांवर “महाराष्ट्र शासन” लिहीता येत नसल्याचे त्यांनी अर्जात नमूद केलेले आहे.

सदर प्रकरणाच्या चौकशी आणि कार्यवाहीसाठी महाराष्ट्रातील प्रादेशीक परिवहन अधिकारी व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांना आपल्या स्वाक्षरीनीशी आदेशीत करून त्यांच्या त्यांच्या कार्यालयाचे वायुवेग पथक यांच्या मार्फत शासनाच्या खातेवाहनावर “महाराष्ट्र शासन” असे लिहीलेले आढळल्यास अशा वाहनांवर मोटार वाहन कायदा व नियमाअंर्तगत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश / निर्देश निर्गमित करावेत. अशी मागणी नरेश जैन यांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share