547 ग्रामपंचायतीची आभासी सेवा ठप्प

गोंदिया: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे संगणीकरण करण्यात आले. संपूर्ण माहिती आता संगणकात बं असून दाखले देखील संगणीकृत देण्यात येत आहे. त्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीत परिचालक देण्यात आले आहे. मात्र त्यांचे वेतन देण्यात आले नसल्यामुळे परिचालकांन कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या कामकाजावर झाला आहे. महत्वाचे दाखल मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. या युगात ग्रामपंचायती देखील मागे राहू नयेत, याकरिता संपूर्ण ग्रामपंचायतींचे संगणीकरण करण्यात आले. संगणक हाताळण्याकरिता राज्यस्तरावर एका निमशासकीय एजेंसीमार्फत गावातीलच एका व्यक्तीच संगणक परिचालक म्हणून निवड करण्यात आली. परिचालकाला वेतन म्हणून ग्रामपंचायतीकडून वर्षाच्या सुरवातीलाच 1 लाख 12 हजार 331 रुपये घेते. त्यातूनसाडेसहा हजार रुपये मानधन म्हणून परिचालकांना देण्यात येते.

उल्लेखनीय म्हणजे, ग्रामपंचायती आधीच पैशांचा भरणा त्या एजेंसीकडे करतात. असे असले तरी परिचालकांना एजेंसी नियमीत मानधन देत नाही. मानधन वाढीची अनेक दिवसांची मागणी असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे परिचालकांनी अखेर कंटाळून 4 एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीची कामे रखडली आहेत. नागरिकांना अनेक कामांकरिता हवे असलेले दाखल देखील मिळत नाहीत. एजेंसीच्या बेजबाबदार धोरणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे.

Share