50 लाखांची लाच घेतांना जलसंधारण विभागाचे 3 अधिकारी अडकले सापळ्यात

◼️लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये नागपूरचा 1 तर चंद्रपूरचे 2

चंद्रपूर : येथील जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल 50 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी जलसंधारण विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली होती. त्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी कंत्रादारांकडून तब्बल 81 लाख रुपयांची लाचेच्या स्वरूपात मागणी केली होती. तडजोडीनंतर पहिल्या टप्प्यात 50 लाख रुपयांची रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले.

मात्र लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कोल्हापूरी बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाच्या बिलाची वितरीत केलेल्या बिलाकरिता व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरिता 50 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जलसंधारण कार्यालय चंद्रपूर येथील 2 अधिकाऱ्यांना अटक केली. 

सदर कारवाई नागपूर येथे मंगळवारी उशिरा करण्यात आली. दरम्यान या कारवाईत नागपूर च्या एका अधिकाऱ्याला सुद्धा अटक करण्यात आली असून, एकूण 3 आरोपी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीमधे चंद्रपूरचे प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे, नागपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील, चंद्रपुरातील विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम यांचा समावेश आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे यांनी केली.

Share