नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेतील गैरप्रकार थांबवा, देवरी येथील परीक्षा केंद्राकडे सर्वांचे लक्ष

◼️गैरप्रकार थांबवा पालकांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

◼️जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी या तालुक्यातील परीक्षा केंद्राकडे विशेष लक्ष द्या

देवरी 30: यावर्षी नवोदय परीक्षा आज ३० एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. मात्र या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी निवेदनातून केली आहे.

या परीक्षा दरम्यानचा मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता काही विशिष्ट तालुक्यातील विद्यार्थांची निवड जास्त प्रमाणात होत अधिक असल्याचे चित्र आहे. काही विशिष्ट तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर कार्यरत कर्मचारीच काही विद्यार्थ्यांना पेपर सोडवायला मदत करतात. त्यामुळे इतर पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यामुळे हा गैरप्रकार थांबविण्यात यावा व पात्र विद्यार्थी यांना प्रवेश देण्यात यावा या मागणीचे निवेदन जागरुक पालकांनी दिले. नवोदय विद्यालय समितीमार्फत आज ३० एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासंदर्भात जिल्ह्यात विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. मागील काही वर्षांचा निकाल पाहिला असता जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी या तालुक्यातील विद्यार्थ्यांचे निवडीचे प्रमाण जास्त आहे. काही तालुक्यातील नवोदय परीक्षा केंद्रांवर अनेक गैरप्रकार होत असल्याची चर्चा आहे. ज्यामध्ये परीक्षा केंद्रांवर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही विशेष विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यास मदत केली केली जात असल्याचा आरोप केला आहे.

हा प्रकार अतिशय गंभीर असून त्यामुळे पात्र व होतकरू विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे. या प्रकरणाची शहानिशा करुन जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष पुरवून गैरप्रकार थांबविण्याची मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांना दिलेल्या निवेदनातून संजय राऊत यांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share