देवरी शहराच्या हद्दीतील झुडपी जंगल जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल करा-नगराध्यक्ष संजू उईके
देवरी 29: देवरी नगरपंचायतचे नवनियुक्त नगराध्यक्ष संजू उईके यांनी नुकतेच गोंदिया जिल्हाचे जिल्हाधीकारी यांना निवेदन सादर केले असून निवेदनात शहराच्या हद्दीतील प्रभाग क्र.१२ ते १७ पर्यन्त च्या एकूण २२ हेक्टर क्षेत्रातील झुडपी जंगलात मागील ३०ते ४० वर्षापासून लोकांनी अतिक्रमण केल्याची नोंद आहे. तरी त्यांचे अतिक्रमण नियमानुकूलित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमनुक करुण त्यांचा मार्फत या अतिक्रमण जागेचे प्रस्ताव तयार करुण शासनाला पाठविन्याचे निवेदन देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके यांचा नेतृत्वात गोंदियाचे जिल्हाधिकारी यांना सोमवारी (ता.२५ एप्रील) रोजी सादर करण्यात आले.
सादर केलेल्या निवेदनात देवरी नगरपंचायत ही नव्याने स्थापीत नगरपंचायत आहे. या शहराच्या हद्दीतील प्रभाग क्र १२ ते १७ पर्यंत च्या एकूण २२ हेक्टर वर लोकांनी केलेल्या अतिक्रमण जागेची झुडपी जंगल म्हणुन नोंद आहे. या शहरात अनेक नागरीक हे प्रभाग क्र.१२ ते १७ येथे मागील ३० ते ४० वर्षापासून अतिक्रमण करुण वास्तव्य करित आहे.परंतु त्यांनी केलेल्या अतिक्रमण जागेला नियमानुकूल न केल्याने त्यांच्यावर शासनातर्फे मिळणाऱ्या प्रधानमंत्री घरकुल योजना आणि शासनाच्या मूलभूत गरजा व सोयी सुविधे पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
तरी त्यांनी झुडपी जंगल च्या जागेवर केलेले अतिक्रमण नियमानुकूलित करण्यासाठी वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत या जागेचे सर्वेक्षण करून सदर प्रस्ताव वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करावे .जेने करुण देवरी शहरातील अतिक्रमण केलेली जागा ही नियमानुकूलित करण्यास मदत होईल असे मागणी नमूद आहे.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके, नगरसेवक रितेश अग्रवाल ,माज़ी नगरसेवक प्रवीण दहिकर ,दिनेश भेलावे यांचा समावेश आहे.