३० एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा

◼️प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आवश्यक
◼️ स्वाक्षरी नसल्यास प्रतिज्ञापत्र भरुन देणे अनिवार्य

प्रहार टाईम्स न्यूज नेटवर्क
देवरी 28 : जवाहर नवोदय विद्यालय समिती द्वारा इयत्ता 6 वी करीत शैक्षणिक वर्ष 2022-23 सत्राकरीता 30 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरलेले आहे, अशा विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in या वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत व डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रावर आपल्याच शाळेच्या मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. प्रवेश पत्रावर स्वाक्षरी नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांना व विद्यार्थ्याला प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल. त्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेला बसता येणार नाही. प्रतिज्ञापत्राचा नमुना परिक्षाकेंद्रावर उपलब्ध राहील. परीक्षा झाल्यानंतर सदर प्रवेशपत्र परीक्षा केंद्रात जमा करावे लागेल.

Print Friendly, PDF & Email
Share