पोलिसांना मटण पार्टी भोवली, 3 पोलीस कर्मचारी निलंबित

◼️पो. हवा. दिलीप धावडे, खूशांत कोचे, राजेंद्र लांबट या तिघांचे निलंबनाचे आदेश

भंडारा 28: रेतीचा अवैध व्यवसाय करणारे आणि मारहाण प्रकरणातील आरोपी सोबत मटण पार्टी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या पार्टीत सहभागी असलेले पवनी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिलीप घावडे हे आपल्या विक्रमाच्या गप्पा मारताना दिसत आहे. आतापर्यंत अनेकांची नावे उडविली. ही किरकोळ गोष्ट आहे असे सांगून दोषींना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचे व्हायरल विडिओ मध्ये दिसते. यामुळे पोलीस खाते खडबडून जागे झाले असून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मारहाणीचे प्रकरण वेगळ्याच दिशेने जात असल्याचे दिसू लागले आहे. दरम्यान अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली होती. या व्हिडीओची सत्यता तपासून चौकशीअंती कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले. भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यावर रेती माफियांकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील कर्मचारी चक्क आरोपी आणि रेती तस्कर यांसोबत मटण पार्टी करीत असल्याच्या विडिओ बाहेर आल्याने खळबळ माजली आहे. ही बातमी प्रसार माध्यमात झळकताच पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी पवनी पोलीस स्टेशन गाठले. आणि चौकशी चे आदेश दिले. सायंकाळ होत पर्यंत वीडियो मध्ये दिसत असलेल्या पो. हवा. दिलीप धावडे, खूशांत कोचे, राजेंद्र लांबट या तिघांचे निलंबनाचे आदेश काढले आहे. पोलिसांना निलबिंत करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.

तिघांचे निलंबन झाले असले तरी सुद्धा ही कारवाई अपूर्ण असल्याची चर्चा आता रंगली आहे. पोलीस कर्मचारी दिलीप ढवळे हा तुमसर पोलीस स्टेशन ला कार्यरत होता अणि पार्टी करीत असताना तेथील गोष्ट सुद्धा संगत आहे. हा तर किरकोळ विषय आहे, तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे स्वतः उडविली आहेत, इतकेच नाही तरआई जी ने म्हंटलं की काहीही करू शकतो असा धक्कादायक वक्त्वव्य दिलीप ढवळे नामक पोलीस कर्मचारी यात करत आहे. त्याने तुमसर मध्ये कुणाचे नाव उडविली अणि कुणाचे आदेशावर हे कार्य केले? याची चौकशी विभाग करील की नाही? किंवा असल्याच जातीचा म्हणुन त्याच्या या कृत्या वर पडदा पाडतील, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share