आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देवरीच्या खेळाडूंची बाजी

देवरी 29: नुकतेच पोखरा, नेपाळ येथे पार पडलेल्या 5 व्या आंतरराष्ट्रीय युथ गेम्स मध्ये देवरीच्या योगा स्पोर्ट्स अकादमीचे 3 खेळाडूंना तसेच गोळा फेक मध्ये 1 खेळाडू ला असे 4 सुवर्ण पदक प्राप्त झाले असून ही आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहेत. योगा स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक रोहित ब्राम्हणकर तसेच गोळा फेक चे प्रशिक्षक स्वप्निल ठाकरे, सचिन बावनकर यांच्या मार्गदर्शनात सदर विद्यार्थी स्पध्येमध्ये सहभागी झालेले होते. सर्व पदक विजेत्यामध्ये तेजस विजय मते ने ( Traditional individual yoga) , देवाशिष रविंद्र मारबते व भव्य हरीश कुमार दोनोडे यांनी ( Artistic pair yoga ) या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले . तसेच गोळा फेक मध्ये क्रिश सुंदरलाल उइके याने सुवर्ण पदक प्राप्त करत देवरी तालुक्याचा नाव लौकिक केला आहे. सुवर्ण पदक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले आई वडिल तसेच प्रमोद कळमकर, गणेश मुनीश्वर, रोहित ब्राम्हणकर, स्वप्निल ठाकरे, छचिन बावनकर व इतर गुरुजनांना दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share