समर्थ महाविद्यालयात 14 शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप

◼️मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप

लाखनी:
स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आज मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी ज्या गावात बसची सोय नाही त्या विद्यार्थिनींना सायकल देण्यात येते. आज प्राचार्य डॉ दिगंबर कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थिनींना सायकल वितरण करण्यात आले. यावेळी डॉ कापसे यांनी विद्यार्थिनींना सायकल चाबी देवून त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ कापसे यांनी मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप ही योजना चांगली असून यामुळे मुलींच्या शिक्षणातील संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बाहेर शहराच्या ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेता येत आहे. सायकल वितरण करताना सर्व 14 विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रा धनंजय गिरहेपूंजे, कनिष्ठ विभाग प्रमुख अशोक गायधनी, योगराज डोरलीकर, सुरेश केदार, पद्मजा कुलकर्णी, प्रशांत वंजारी, अजिंक्य भांडारकर, रीना साठवणे, मंगेश शिवरकर, श्याम पंचवटे आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गायधनी यांनी तर संचालन पद्मजा कुलकर्णी व आभार अजिंक्य भांडारकर यांनी मानले.

Share