गोंदियाच्या शुभम मेश्राम चे राज्य लोक सेवा आयोग परीक्षेत यश

◼️आई वडिलांचे स्वप्न केले पूर्ण…

Gondia: वडिलांचा छोटा मोठा उद्योग तर आई अंगनवाडी मधे परिचारिका मात्र मुलांच्या शिक्षणासाठी जीवापाड मेहनत घेत आपला मुलगा अधिकारी व्हावा म्हणून नेहमी प्रयत्नरत.
सुरवातिपासूनच अभ्यासात हुशार असलेला शुभम राजू मेश्राम मोठेपनी आपन अधिकारी व्हावे असे त्याला नेहमिच वाटत होते त्या दिशेने असलेले त्याचे प्रयत्न त्याला यशाकडे घेऊन गेले.
२०१९ मधे झालेल्या राज्य लोक सेवा आयोगच्या परिक्षेचे निकाल नुकतेच जाहिर झाले त्यामधे शुभम उत्तीर्ण होऊन मृदा व जल संधारण विभागात सहायक अभियंता श्रेनी २ चे पद मिळविले.
गोंदियाच्या सरस्वती विद्या मंदिर मधुन १० व्या वर्गात ८५% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाला तर जूनियर कॉलेज चे शिक्षण गोंदिया येथील डी. बी. साइंस कॉलेज मधुन करत शुभम ने ईयत्ता बारविला ८१% गुण प्राप्त केले. त्यानंतर आपले पदवीचे शिक्षण स्थापत्य (सीव्हील इंजीनियरिंग) यशवंतराव चव्हान कॉलेज आफ इंजीनियरिंग नागपुर मधुन २०१६ ला प्रथम श्रेणीत पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली येथे ६ महीने प्रशिक्षण पूर्ण करुन गोंदियाला परतला. पहिल्या व दुसर्या प्रयत्नात मुलाखात पर्यंत मजल मारली पण यश नाही मिळाले. दरम्यांच्या काळात पंचायत समिति देवरी येथे पंतप्रधान आवास योजना मधे कंत्राटी तत्वावर सहायक अभियंता म्हणून नौकरीवर रुजु झाला व त्याच बरोबर अभ्यासही सुरुच ठेवला व यश मिळवीले.
त्याला या यशामधे वेळवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहान देणारे आई इंदीरा मेश्राम वडील राजु मेश्राम ताई सुरुची टेम्भुर्निकर, अश्विनी भावे जीजाजी अभिजित टेम्भुर्निकर (स्थापत्य अभियंता म. न.पा.पुणे) अनूपकुमार भावे (विस्तार अधिकारी पं. स. तीरोडा) व सत्य सामाजिक संस्था देवरी चे संचालक देवेंद्र गणविर अध्यक्ष रविंद्र गणविर व एकात्मीक बाल विकास ठाना बिट चे नीरिक्षिका मावशी त्रिलोका नंदागवळी व जिल्हा समुपदेशक मिलिंद रंगारी यांचे शुभम ने आभार मानले.

Print Friendly, PDF & Email
Share